Marmik
महाराष्ट्र

दहावीचा निकाल 96 टक्के लागला; कोकण विभागच अवल

औरंगाबाद : नितीन दांडगे –
फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल 17 जून रोजी लागला यंदा दहावीचा निकाल 96. 94 टक्के एवढा लागला असून कोकण विभाग अव्वल आला आहे.

दहावीच्या लागलेल्या निकालात पुणे विभाग 96. 96 टक्के नागपूर विभाग 97 टक्के, औरंगाबाद विभाग 96.5 टक्के, मुंबई विभाग 96. 94%, कोल्हापूर विभाग 98.50 टक्के, अमरावती विभाग 96. 81 टक्के, नाशिक विभाग 95. 90 टक्के लातूर विभाग 97.7 27 टक्के तर कोकण विभाग 99 . 27 टक्के एवढा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागातून एकाही विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण मिळाले नाहीत लातूर विभागात 70 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागातील प्रत्येकी 18 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांना तर पुणे विभागातील आठ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यास शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

Related posts

…अन्यथा ईशान्य भारत देशा पासून कायमचा तुटेल! – राज ठाकरे

Gajanan Jogdand

पत्रकारितेतील हरवत चाललेली मूल्य

Gajanan Jogdand

धान्य चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment