Marmik
Hingoli live

निकेश कांबळे याच्या खुनाचा झाला काही तासात उलगडा; आरोपी गजाआड

हिंगोली : संतोष अवचार /-

कळमनुरी शहरातील साई नगर परिसरातील मोकळ्या मैदानावर त्याच परिसरात राहणारा युवक निकेश कांबळे 23 वर्ष याचा 14 जून रोजी रात्रीच्या दरम्यान मृतदेह आढळून आला होता. मयत निकेश कांबळे यास दगडाची व इतर साधनाने मारहाण करून गंभीर दुखापत करून त्याचा खून केला गेला होता. त्याबाबत निवृत्त युवकाच्या यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान 302 अन्वय अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणाचा अवघ्या काही तासात उलगडा झाला असून गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यात पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सदरील पुण्याच्या घटनास्थळी कळमनुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ पोहोचून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी श्वानपथक व अंगुलीमुद्रा पथक यांनी हे पाहणी केली होती गुन्ह्यातील आरोपी अज्ञात असल्याने तपास पथकाकडे तात्काळ गुन्हा उघड करून आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. घटनास्थळी हिंगोली पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनीही भेट देऊन घटनास्थळ व परिसराची पाहणी करू नका दिवसभर कळमनुरी पोलीस ठाणे येथे थांबून सभासदांना सूचना व मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा तपास व आरोपी यांचा शोध करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कळमनुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार असे 3 तपास पथकाने तंत्रशुद्ध पद्धतीने विविध दिशेने तपासाची चक्रे फिरवून सायबर सेल हिंगोली व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने अवघ्या बारा तासाच्या आत गुन्ह्यात सहभागी दोन्ही आरोपी अभिजीत बाबाराव मस्के (वय 23 वर्षे राहणार शास्त्रीनगर कळमनुरी), आकाश विठ्ठल सातव (वय 24 वर्षे राहणार कळमनुरी) यांना शिताफिने ताब्यात घेऊन विचारपूस विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे हे करीत आहेत.

ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपिनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गजभारे, पोलीस अंमलदार सोपान सांगळे, पोलीस हवलदार भारत घ्यार, संभाजी लेकुळे, एस. रिठे, महिला पोलीस हवालदार पारू कुडमेचे, सुनिता धुळे, सुनिता धनवे, आर. व्ही. वरणे, एस.डी. उपगरे, पोलीस नाईक, किशोर कातकडे, राजू ठाकुर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, काळे, माधव भडके, पवन चाटसे, चव्हाण, गजानन होळकर, शशिकांत भिसे, जाधव, कांबळे, ढोकळे, बेले, सुमित टाले, दत्ता नागरे, रोहित मुदीराज, सर्व कळमनुरी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल हिंगोली यांनी केली.

Related posts

नगरपरिषदेची नूतन इमारत अस्वच्छ; मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

Santosh Awchar

नागरिकांच्या समस्यांचे निराकरण सहज होण्यासाठी पोलीस आपल्या दारी उपक्रम, डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची संकल्पना

Santosh Awchar

मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढविल्यास डीजे वर होणार कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment