हिंगोली : संतोष अवचार /-
येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर 15 जून रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करतांना हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी मागील सर्व सर्व उत्सव अतिशय आनंदात व शांततेत तसेच नियमांचे पालन करून साजरे केल्याबद्दल हिंगोली वासियांचे धन्यवाद मानले.
हिंगोली जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शांतता समितीचे आयोजन केले होते सदर जातीय सलोखा व शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे औंढा नागनाथ नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजू खंदारे हिंगोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शफिक, शेख नेहाल, ठाकूरसिंग बाबरी तसेच हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरिक, धर्मगुरू व विविध क्षेत्रातील मान्यवर माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले. त्यात त्यांनी जिल्ह्यातील शांतता व जातीय सलोखा टिकवून ठेवले ही प्रत्येकाची जबाबदारी असून सध्याच्या वातावरणात जिल्ह्यात कोणतेही धार्मिक भावना दुखावणारे कृत्य कोणीही करू नये. तसेच कुठेही कायद्याचे बुलंद होत असेल व कोणीही आक्षेप आर्य कृत्य करत असेल तर त्यावर तत्काळ पोलिसांकडून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. विनाकारण कोणीही कायदा हातात घेऊ नये व कोणाचाही दबाव व चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल माध्यमांवर अतिशय दक्ष राहून त्याचा वापर करावा, आपले मुल काय करत आहेत, कुठले कृत्ये त्याच्याकडून होत नाही ना, यासाठी पालकांनी व आपण समाजातील सर्व प्रमुख व्यक्तींनी दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविका नंतर सदर शांतता मितीच्या बैठकीस उपस्थित सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी सूचना सांगून प्रत्येकाने जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी सर्व परीने एकजुटीने प्रयत्न करू, अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी हिंगोली जिल्हा शांतताप्रिय असून जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी मागील सर्व सण व उत्सव अतिशय आनंदात व शांततेत तसेच नियमांचे पालन करून साजरे केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले. सर्व धर्मीय आणि एकजुटीने एकमेकांचे आदर व सन्मान करून शांतता राखावी, कोणी समाजकंटक जाणून बुजून समाजात द्वेष पसरवत असेल तर तसे काही घटक प्रयत्न करत असतील तर सर्वांनी एकजुटीने मिळून त्यास विरोध करून कायदेशीर कार्यवाहीत पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत दक्ष राहून करण्याची सूचना केली. तसेच बैठकीतून आलेल्या सूचनेनुसार पुढील काळात हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक व जातीय सलोखा साठी पोलीस दलाकडून क्रिकेट मॅच व इतर खेळ, वृक्षारोपण, रक्तदान आदी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी मानले. तर या बैठकीच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, मुळतकर आदींनी प्रयत्न केले.