Marmik
Hingoli live

बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई

हिंगोली : संतोष अवचार /-

येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माळहिवरा येथील एकास बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याने स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या व्यक्ती विरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंदे विरुद्ध व बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीचे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 20 जून रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत माळहिवरा येथील एका व्यक्तीस बेकायदेशीररित्या शस्त्र (तलवार) बाळगताना मिळून आल्याने त्यास शस्त्रांसह ताब्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोह शंकर जाधव, शेख शकील, वापोना प्रशांत वाघमारे यांनी केली.

तसेच दुसऱ्या कार्यवाहीत 19 जून रोजी नरसी नामदेव येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केसापुर हद्दीतील राहणारा नामदेव दादाराव पवार हा बेकायदेशीर रित्या स्वतःच्या ताब्यात शस्त्र (रामपुरी चाकू) बाळगताना मिळून आला. त्यास शास्त्राचा ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, पोलीस नाईक कचुरे, महाराष्ट्र पोलीस शिपाई घुगे यांनी केली.

Related posts

जि. प., पं. स. निवडणूक; आरक्षण निश्चितीसाठी 13 जुलै रोजी सभा

Gajanan Jogdand

हट्टा पोलिसांची विशेष कामगिरी: बारा तासात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद, मुद्देमाल ही हस्तगत

Gajanan Jogdand

संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर व कयाधू नदी घाटावर ‘1 तारीख एक तास महाश्रमदान’

Gajanan Jogdand

Leave a Comment