Marmik
Hingoli live

विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचा दहावीचा शंभर टक्के निकाल

सेनगाव : पांडुरंग कोटकर –

तालुक्यातील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, कोळसा या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षीचा इयत्ता 10 वी चा निकाल 100% लागला आहे. त्यामध्ये एकूण 104 विद्यार्थ्यांपैकी 104 विद्यार्थी पास झाले.

विशेष प्राविण्य यामध्ये 88 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 16 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये अनुक्रमे प्रथम मेघा प्रल्हाद खिल्लारी 93.80% , द्वितीय ओमकार आश्रुजी चोपडे 93.40%, तृतीय साक्षी महादु रोडगे92.40%, चतुर्थ दिव्या संतोष वाव्हळ 92.40%, पाचवी शितल भगवान खिल्लारी 92%हे आहेत.वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ व सचिव अंकुशराव बेंगाळ, विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक बेंगाळ व अभिलाषा बेंगाळ मुख्याध्यापक सानप एस.एस., सरकटे व्ही.एस., बाजगिरे बी.जी. कसाब पी.पी. व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Related posts

स्वच्छतेसाठी जिल्ह्यात विशेष अभियान; 22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन 

Gajanan Jogdand

पिक विम्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे पेनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन

Jagan

हवामान खात्याचा इशारा : पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता! नागरिकांनी खबरदारी घ्यावी – जिल्हाधिकारी

Santosh Awchar

Leave a Comment