सेनगाव / पांडुरंग कोटकर
शेगावीचे श्री गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर कडे जात असताना सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे आले असता या पालखीचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी आदरातिथ्य करून श्रींचे दर्शन घेतले.
विदर्भातील शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा covid-19 च्या नंतर तब्बल दोन वर्षांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाला आहे पोर्ट हा पालखी सोहळा शेगाव येथून रिसोड- सेनगाव -नरसी नामदेव -डिग्रस कराळे अशा मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहे. हा पालखी सोहळा रिसोड सेनगाव महामार्गावरील कोळसा येथील विद्यासगर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या गेट समोरून आगमन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, उपाध्यक्ष आनंददायी बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, अभिलाशा बेंगाळ व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री गजानन महाराजांच्या सर्व सेवाधारी भक्तांना फळांचे वाटप करून श्रींचे दर्शन घेतले.