हिंगोली : संतोष अवचार –
जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहावा व शांतता नांदावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण हिंगोली पोलीस विभाग प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून 19 जून रोजी हिंगोली येथील संत नामदेव पोलिस मुख्यालय मैदानावर एकता चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये सर्व जाती धर्माचे युवक व खेळाडू सहभागी झाले होते.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून सर्व जाती धर्मातील नागरिकांनी आणि परस्पर स्नेह व सद्भावना बाळगून राहावेत यासाठी एकोणावीस जून रोजी संत नामदेव पोलिस मुख्यालय मैदानावर एकता टेनिस बॉल क्रिकेट चषक सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिकेट सामन्यात खेळणारे खेळाडू हे हिंगोली शहर व परिसरातील विविध जाती-धर्माचे शिक्षण घेणारे व व्यवसाय करणारे युवक होते. क्रिकेट सामन्यात हिंगोली शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी होते या क्रिकेट सामन्यांच्या ठिकाण पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोली संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या क्रिकेट सामन्यात एकूण आठ संघाचा समावेश होता सुरुवातीला उपस्थित प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचे दोन संघात 8-8 षटकांचा सामना खेळला गेला. सदर संघात पोलीस अधिक्षक यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी ही सहभागी होऊन क्रिकेटचा सामना खेळला. त्यात विजेत्या संघास पोलीस अधीक्षक व मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. इतर आलेला युवकांचे एकूण सहा संघातून सात सामने खेळवले गेले. त्यात आदर्श इलेव्हन संघाने अंतिम सांगून सामना जिंकून प्रथम क्रमांक तर एकता क्रिकेट क्लब या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तर पारितोषिकमध्ये मॅन ऑफ द सिरीज जुनेद अहेमद, बेस्ट बॅट्समन सुमित जयस्वाल, बेस्ट बॉलर सुधीर ढेंबरे यांनी मिळविला विजेत्यांना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहून सर्वांनी स्नेह व परस्पर सद्भावनेने वर्तन करून शांतता राहण्यासाठी सहकार्य करावे म्हणून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आयोजित केलेल्या एकता क्रिकेट चषक सामन्यांचे कौतुक केले. तसेच पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी उपस्थित राहून व स्वतः खेळात सहभागी झाल्याने इतर खेळाडूंचाही प्रचंड उत्साह वाढला होता. क्रिकेट सामन्यांचे पंच म्हणून राम चरण, विनायक राजपूत, रवी दुबे यांनी तर स्कोरर म्हणून दिलीप खंदारे व समालोचक म्हणून अतुल शेळके यांनी काम पाहिले. सामन्यांच्या यशस्वीतेसाठी हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कच्छवे व राखीव पोलीस उपनिरीक्षक मूळतकर यांनी प्रयत्न केले.