सेनगाव : जगन वाढेकर –
येथील बोगस प्रमाणपत्र तयार करून जनतेच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या दोघा मुन्नाभाई वर सेनगाव पोलीस ठाण्यात भादवि अन्वय कलमानुसार तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायिक अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव येथे आरोपी ज्ञानबा केशवराव ते काळे (रा. केसापूर ता. जि. हिंगोली) व माधव बि. रसाळ (रा. हाताळा ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी हृदय अशोक हॉस्पिटल या नावाने खाजगी हॉस्पिटल थाटून तसेच संगणमत करून कोणतेही वैध वैद्यकीय पदवी नसताना बनावट प्रमाणपत्र तयार करून बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती हिंगोली नगरपंचायत स्तरीय समिती सेनगाव यांच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींवर सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा सदस्य सचिव बोगस वैद्यकीय व्यवसाय तालुकास्तरीय समिती सेनगाव डॉ. सचिन राठोड यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायिक अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेले नसून पुढील तपास पोलिस करत आहेत.

