मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – समाजात कलह निर्माण होईल असे आक्षेपहार्य पोस्ट सोशल मीडियावर केल्याने अकरा सोशल मीडिया धारकावर हिंगोली येथील सायबर सेलने कारवाई केली आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये त्यावर प्रतिबंध व्हावा त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.
सदर पथक अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे दत्ता नागरे, रोहित मुदीराज, इरफान पठाण यांची नेमणूक केली आहे.
सदरील सायबर सेल विभागाने मागील आठवड्यात 3 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या दहा instagram व एक व्हाट्सअप वापरकर्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये नोटीस देऊन सोशल मीडिया पेज व अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
अशा प्रकारे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून असे कृत्य करणाऱ्यांची जेलवारी अटळ असल्याचे डॅशिंग जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
सोशल मीडियावर सायबर सेलचे विशेष लक्ष
काही समाजकंटकाकडून सोशल मीडियावर विविध समाजात जाती धर्मात पेड निर्माण होईल तसेच महापुरुषांची विटंबना होईल व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या आक्षेपार्य पोस्ट केल्या जातात. त्यास आळा बसावा तसेच सामाजिक व जातीय सलोखा टिकून राहावा म्हणून हिंगोली सायबर सेलची टीम विशेष लक्ष ठेवून आहे.