Marmik
News क्राईम

11 instagram वापरकर्त्यांचे अकाउंट बंद! सायबर सेल ची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या 11 instagram वापरकर्त्यांवर हिंगोली येथील सायबर सेल विभागाकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही करत त्यांचे अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊन त्यावर प्रतिबंध व्हावा त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीस आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथकात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, रोहित मुदीराज, इरफान पठाण, दीपक पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदरील सायबर सेल विभागाने मागील आठवड्यात 23 ते 29 जानेवारी दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या 11 instagram वापर करताना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वय नोटीस देऊन सोशल मीडिया पेज वा अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

अशा प्रकारे जाती धर्मात पेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे कृत्य करणाऱ्यांची जलवारी अटळ असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

Related posts

जिल्हा कार्यक्रमाधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांची मार्मिक महाराष्ट्राचे संपादक गजानन जोगदंड यांनी घेतली सदिच्छा भेट

Gajanan Jogdand

वाटर फिल्टर करू लागले सरपंच, ग्रामसेवकांची पैशांची ‘तहान’ दूर! भानखेडा उपसरपंचाचे सेनगाव गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Gajanan Jogdand

दरोडा घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या! 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Gajanan Jogdand

Leave a Comment