Marmik
क्राईम

बळसोंडे येथून 20 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त! दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरालगत असलेल्या बळसोंड भागातील पंढरपूर नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 20 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघा आरोपी विरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 06/2024 कलम 8 (क) २० (ब) ii (क) एमडीपीएस अॅक्ट व सहकलम 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेस अवैध धंद्याविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा लागवड व विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यावरून 5 जानेवारी रोजी रात्रगस्त दरम्यान हिंगोली शहर पोलीस ठाणे हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पंढरपूर नगर बळसोंड येथील जगदंब हॉस्पिटलच्या पाठीमागे राहत असलेला इसम नामे परसराम मस्के यांनी त्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा विक्री करण्यासाठी साठवणूक केली आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा कार्यवाही कामी लागणारे सर्व साहित्यसह तात्काळ रवाना होऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे इसम नामे परसराम सुभाषराव मस्के (वय 39 वर्ष रा. पारडा हं. मु. पंढरपूर नगर बळसोंड ता. जि. हिंगोली) व रवी रुस्तुमराव पोले (वय 35 वर्ष रा. रीसाला बाजार हिंगोली) हे

एका पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोत्यामध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला अर्धवट ओलसर पालापाचोळा हिरव्या रंगाचा उग्रट वास येत असलेला एकूण 20 किलो 600 ग्रॅम वजनाचा (किंमत 4 लाख 12 हजार रुपये) व मोटार सायकल तसेच मोबाईल असा एकूण 4 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी नमूद आरोपींविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 06/2024 कलम 8 (क) २० (ब) ii (क) एमडीपीएस अॅक्ट व सहकलम 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, पारू कुडमेथा राजू ठाकूर, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नितीन गोरे, प्रशांत वाघमारे यांनी केली.

जिल्हा गांजामुक्त करणार – एसपी जी. श्रीधर

मागील काही दिवसांमध्ये हिंगोली येथून तसेच हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत व औंढा नागनाथ पोलीस ठाणे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गांजा पकडला होता. त्यानंतर आता बसून भागातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा लागवड व विक्रीविरुद्ध प्रभावी कार्यवाही करून हिंगोली जिल्हा गांजा मुक्त करणार असे हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.

Related posts

मूडी येथे गांजाची शेती; तुरीच्या शेतात घेतले अंतरपीक ! 91 हजार 728 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

हिंगोली येथील डीजे चालक वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Gajanan Jogdand

सेनगाव नजीक दरोड्याचा डाव उधळला! दरोडेखोरांच्या ताब्यातून शेळ्या, खंजीर, मिरची पूड, दोरी व मोटरसायकल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment