Marmik
News महाराष्ट्र

सहाय्यक सरकारी अभियोक्ता लेखी परीक्षेत 20 मार्काचा प्रश्न आला आऊट ऑफ सिल्याबस! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :-

हिंगोली – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 सप्टेंबर रोजी घेतलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदाच्या लेखी परीक्षेत 20 मार्काचा प्रश्न आऊट ऑफ सिल्याबस आल्याने अनेक उमेदवारांना तो लिहिता आला नाही. याप्रकरणी हिंगोली तालुक्यातील कानडखेडा बु येथील भागवत दगडू खंदारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे, दि 11 सप्टेंबर, 2022 रोजी “सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट – अ” च्या 547 पदाकरिता चाळणी परीक्षा/लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध सेंटरवर पार पडली.दिनांक 9 मे, 2022 रोजी प्रकाशित झालेल्या सुधारित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पेपर क्रमांक 1 मध्ये “अपील/रिविजन” हे “प्रपोजल” च्या स्वरूपात असल्याबाबतचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांना कळविण्यात आले होते.दिनांक 11 सप्टेंबर, 2022 रोजी पार पडलेल्या पेपर क्रमांक 1 चे शीर्षक सुद्धा “क्रिमिनल प्रोसिजर कोड अँड इंडियन इव्हिडन्स ॲक्ट, अपील अँड रिविजन प्रपोजल” असे संबोधण्यात आलेले आहे. आणि ह्या बाबींवरून स्पष्टपणे निदर्शनास आले होते की पेपर क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 1 हा प्रपोजलच्याच माध्यमातून लिहावयाचा आहे.

पेपर क्रमांक 1 (क्रिमिनल प्रोसिजर कोड अँड इंडियन इव्हिडन्स ॲक्ट, अपील अँड रिविजन प्रपोजल) मधील प्रश्न क्रमांक 1 मध्ये सदरील प्रश्नाचे उत्तर हे थेट प्रपोजल च्या माध्यमातून लिहिण्याचे न विचारता अत्यंत संदिग्ध आणि त्रोटक भाषेमध्ये “ड्राफ्ट अपील अथवा रिविजन तयार करा” असे विचारण्यात आलेले आहे

पेपर क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 1 “ड्राफ्ट अपील अथवा रिविजन तयार करा” हा प्रश्न सुधारित अभ्यासक्रम आणि पेपर क्रमांक 1 चे शीर्षक (…अपील अँड रिविजन प्रपोजल) च्या कार्यक्षेत्राबाहेरील विचारण्यात आलेला आहे असे दिसत असून सदरील प्रश्नाचे उत्तर हे नेमके सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे आणि पेपर क्रमांक एक च्या शीर्षकाप्रमाणे (…अपील अँड रिविजन प्रपोजल) लिहावयाचे की प्रश्न क्रमांक एक मधील विचारण्यात आलेल्या अत्यंत संदिग्ध आणि त्रोटक शब्दावली प्रमाणे सदरील अपील अथवा रिविजन याचीका ही अपीलीय न्यायालयामध्ये दाखल करायचे याबाबतीत सदरील प्रश्न क्रमांक एक हा अत्यंत संदिग्ध आणि त्रोटक अवस्थेमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

परिणामतः सदरील प्रश्न माननीय आयोगानेच ठरवून देण्यात आलेल्या सुधारित अभ्यासक्रम आणि पेपर क्रमांक एक च्या शीर्षकाच्या अनुषंगाने “आऊट ऑफ सिल्याबस” असल्याचे दिसून येत आहे.संदर्भीय परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांनी दिली असून, पेपर क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 1 मधील वापरण्यात आलेल्या त्रोटक भाषेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची संदिग्धता दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न क्रमांक 1 जो कि अत्यंत संदिग्ध आणि त्रोटक भाषेमध्ये विचारण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल झालेली आहे.

पेपर क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 1 प्रश्न हा सुधारित अभ्यासक्रमाच्या बाहेर असल्यामुळे आणि पेपर क्रमांक 1 च्या शीर्षकालाच (…अपील अँड रिविजन प्रपोजल) बाधा पोहोचवण्यासारखा असल्याकारणाने रद्द का करण्यात येऊ नये? याबाबतीत माननीय आयोगाने निश्चितच विचार करावा अथवा संबंधित प्रश्नाचे उत्तर आयोगाला अपेक्षित काय होते याबाबतीत जर सुस्पष्टता केली तर विद्यार्थ्यांच्या मनातील शंकेचे निराकरण होईल.

‘मी अत्यंत विनम्रपूर्वक आणि आदरपूर्वक नमूद करू इच्छितो की माझ्या वरील नमूद अर्जातील विषय हा अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या भावी भविष्याशी निगडित असल्याकारणाने आयोगाने माझ्या अर्जावर त्वरित कार्यवाही करावी.

‘मी, अत्यंत विनम्रपूर्वक आणि आदरपूर्वक नमूद करू इच्छितो की माझ्या अर्जातील मजकूर हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचे आणि माझे सुद्धा एक विद्यार्थी म्हणून नुकसान होऊ नये या प्रामाणिक भूमिकेतूनच सदरील अर्ज आयोगापुढे दाखल करीत आहे’ असे या तक्रारीत म्हटले आहे.

सदरील तक्रार ही हिंगोली तालुक्यातील कानडखेडा बु येथील भागवत खंदारे यांनी दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी आयोगाला अर्जदाराने रजिस्टर पोस्टाद्वारे सदरील तक्रार पाठविलेली आहे.

Related posts

जिल्हा सामान्य रुग्णालयात एकीकडे औषधांचा तुटवडा तर दुसरीकडे औषधांची नासाडी, रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Gajanan Jogdand

अभियंत्याच्या जेसीबीने कामे केली तरच मिळताहेत विहिरीच्या कामाचे बिल! सेनगाव येथील प्रकार

Gajanan Jogdand

अनधिकृत चालते एआरटीएम इंग्लिश स्कूल!! गटविकास अधिकाऱ्यांनी दिले कार्यवाहीचे आदेश!

Santosh Awchar

Leave a Comment