मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील अल्पवयीन मुली सोबत वेळोवेळी शारीरिक जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस 20 वर्षे सश्रम कारावास व 70 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा अपर जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश वसमत यु. सी. देशमुख यांनी दिली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिने 22 दिवसात सदर गुन्ह्याचा निकाल लागला आहे.
वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 30 मे 2022 रोजी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हिचे अपहरण केले बाबत तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी करून पुण्यातील पीडित मुलगी व आरोपी यांचा शोध घेऊन पुण्यातील पिढीत मुलीस आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले.
आरोपी शुभम केशव गायकवाड (रा. इंजनगाव) यास अटक करून तपास केला. तपासून मुलगी व फिर्यादी यांच्या जबाबानुसार जिल्ह्यातील आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन व अज्ञान असल्याचे माहित असूनही तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक शोषण व जबरी संभोग केल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे तपासी अधिकारी यांनी गुन्ह्यात कलम 376 (2) (जे) 376 (2) (एन) भादविसह कलम 3, 4 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये कलम वाढ करून गुन्ह्याचा सखोल व जलद गतीने तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर प्रकरणी अप्पर जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश वसमत यु.सी. देशमुख यांनी जलद गतीने सदर गुन्ह्यात सुनावणी घेऊन सर्व साक्ष पुरावे तपासून अवघ्या दोन महिने 22 दिवसात सदर गुन्ह्यात निकाल दिला.
न्यायालयाने आरोपी शुभम केशव गायकवाड (रा. इंजनगाव) यास भारतीय दंड संहिता व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 नुसार जोशी ठरवून 20 वर्षे सश्रम करावास व 70 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठरवली आहे.
याप्रकरणी हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी त्यांचे मदतनीस पोलीस अंमलदार अविनाश राठोड व अजय पंडित यांनी जलद गतीने करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे व सहाय्यक फौजदार म्हणजे यांनी पैरवी अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.
न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू सहा. सरकारी वकील एस. के. दासरे यांनी भक्कमपणे मांडून सदर गुन्ह्यात दोषसिद्धी होण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.