मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्या हिंगोली पोलिसांतर्फे 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 658 / 2023 कलम 307, 120 व 34 भादवी सह कलम 3 / 25 भारतीय हत्यार कायदा मधील फरार आरोपी अक्षय गुरुदत्त इंदोरिया (वय 25 वर्ष रा. कपडा गल्ली हिंगोली) व ओम गणेश पवार (वय 22 वर्ष रा. कांचन नगर हिंगोली) सदर आरोपी अटक चुकवण्यासाठी फरार आहेत.
सदर आरोपींची माहिती देणाऱ्यास हिंगोली पोलिसातर्फे 25 हजार रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
सदर आरोपीची माहिती 9011320100, 9923104521 या भ्रमणध्वनीवर द्यावी, असे आवाहन हिंगोली पोलिसातर्फे करण्यात आले आहे.