मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील 261 गावांमध्ये यंदा एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्याची पर्यावरण पूरक अशी ओळख महाराष्ट्रात निर्माण होत आहे.
गणेशोत्सव हा भारतीयांच्या प्रत्येकाचाच आत्मीयतेचा आणि भक्तीचा विषय ठरतो. गणेशोत्सव म्हटलं की ढोल – ताशा, फटाके, डीजे आदि आलेच.
तसेच प्रत्येक गल्लीत आणि गल्लीतील प्रत्येक नागरिकांच्या घरी गणेशाची स्थापना केली जाते. गावातही असाच प्रकार असतो. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण आणि गणपती निर्माल्याचा प्रश्न उपस्थित होऊन जलप्रदूषणही होते.
यास रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक गाव एक गणपती ही संकल्पना मागील काही वर्षांपासून राबविली जाऊ लागली आहे. सदरील संकल्पना हिंगोली जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात असल्याचे दिसते.
यंदा गणेशोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक गावात म्हणजेच 261 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून या गावांमध्ये एका गणपतीची सार्वजनिक रित्या स्थापना करण्यात आली आहे.
तसेच यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात एकूण 1385 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 1172 गणेश मंडळ परवानाधारक असून 213 गणेश मंडळ विनापरवाना स्थापन झाले आहेत. यामध्ये हिंगोली शहरात एकूण 99 गणेश मंडळांपैकी 84 गणेश मंडळांनी परवाना घेतला असून 15 गणेश मंडळ विनापरवाना आहेत.
औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीत एकूण 84 गणेश मंडळांपैकी औंढा नागनाथ शहरात 27 परवानाधारक आणि ग्रामीण 57 गणेश मंडळांनी परवाना घेतला आहे तर तालुक्यातील 24 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन झाला आहे.
कळमनुरी शहर व तालुक्यात एकूण 132 गणेश मंडळांची स्थापना झाली असून यापैकी कळमनुरी शहरात 20 गणेश मंडळांनी परवाना घेतला असून सात गणेश मंडळ विनापरवाना आहेत तर ग्रामीण भागात 61 गणेश मंडळांनी परवाना घेतला असून 44 गणेश मंडळ विनापरवाना आहेत तर तालुक्यातील चाळीस गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
वसमत शहरात एकूण 109 गणेश मंडळांची स्थापना झाली असून यापैकी 99 गणेश मंडळांनी परवाना घेतला असून 10 गणेश मंडळ विनापरवाना आहेत.
सेनगाव शहर व तालुक्यात एकूण 149 गणेश मंडळांची स्थापना झाली असून यापैकी सेनगाव शहरात 14 गणेश मंडळांनी परवाना घेतला असून ग्रामीण भागात 130 गणेश मंडळ परवानाधारक आहेत तर पाच गणेश मंडळ विनापरवान आहेत. तालुक्यातील 24 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण 141 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 89 गणेश मंडळ परवानाधारक आहेत तर 52 गणेश मंडळांनी परवाना घेतलेला नाही तर 30 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
हट्टा पोलीस ठाणे हद्दीत एकूण 151 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 142 गणेश मंडळांनी परवाना घेतला आहे तर नऊ गणेश मंडळ विनापरवाना आहेत. 18 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एकूण 95 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 69 गणेश मंडळ परवानाधारक आहेत तर 26 गणेश मंडळ विनापरवाना आहेत. तसेच 26 गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत एकूण 104 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 88 गणेश मंडळ परवानाधारक आहेत तर 16 गणेश मंडळ विनापरवाना आहेत 21 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत एकूण 46 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 43 गणेश मंडळ परवानाधारक आहेत तर तीन गणेश मंडळ विनापरवाना आहेत. दहा गावात एक गाव एक गणपती स्थापन झाला आहे.
बासंबा पोलीस ठाणे हद्दीत एकूण 70 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 65 गणेश मंडळ परवानाधारक आहेत तर पाच गणेश मंडळ विनापरवाना आहेत. वीस गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
तर वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एकूण 97 गणेश मंडळांची स्थापना झाली असून 94 गणेश मंडळ परवानाधारक आहेत. तर तीन गणेश मंडळ विनापरवाना आहेत. 22 गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
अशाप्रकारे एकूण 1385 गणेश मंडळांची जिल्ह्यात स्थापना झाली असून 1172 गणेश मंडळ परवानाधारक आहेत. तर 213 गणेश मंडळ विनापरवाना आहेत. तसेच 261 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन झाला आहे.