Marmik
Hingoli live क्राईम

आरोपींकडून हस्तगत केलेला 29 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक केला परत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंगी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हा घटकातील पोलीस ठाणे च्या गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला 29 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.

हिंगोली चे दर्शन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादी परत करण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

या अनुषंगाने 31 मार्च रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर गुन्ह्यात आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण चार गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असे किमती दोन लाख 95 हजार रुपये, 24 वाहने किंमत 20 लाख 20 हजार रुपये, 34 मोबाईल फोन किंमत 4 लाख 11 हजार रुपये, इतर मुद्देमाल दोन लाख सात हजार रुपये असा एकूण 29 लाख 33 हजार रुपये मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून आजपर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून एकूण एक कोटी आठ लाख 31 हजार 712 रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे

सदरची कामगिरी हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोह सुनील अंभोरे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली.

भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येणार आहे.

Related posts

संभाजी पल्लेवाड व जाधव यांना महावितरण कर्मचाऱ्यांकडून निरोप

Gajanan Jogdand

हिंगोली शहरातील मंगळवारा परिसरातील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध

Gajanan Jogdand

धार्मिक अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडल्या शिवाय समाजाची प्रगती नाही-प्रा.डाॅ. संभाजी बिरांजे

Santosh Awchar

Leave a Comment