Marmik
Hingoli live क्राईम

29 जणांना पकडून न्यायालयात केले हजर, 49 जामीन पात्र वॉरंटचीही बजावणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली –जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त 28 अजामीन पात्र व एक पोटगी असे एकूण 29 वॉरंटची बजावणी करून सदर वॉरंटमधील इसमांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सदरील मोहिमेत 49 जामीन पात्र वॉरंटची ही बजावणी करण्यात आली.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वाचक राहावी म्हणून विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैध धंद्या विरोधात विशेष कार्यवाहीची मोहीम राबविली जात आहे.

त्याच सोबत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समान व वॉरंटनुसार हजर व्हावे, अशी अपेक्षा असते, मात्र न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून प्राप्त अजामीन पात्र व जामीन पात्र, पोटगी वॉरंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनात आज रोजी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत अजामीन पात्र, जामीन पात्र वॉरंट, पोटगी वॉरंट बाबत विशेष मोहीम घेण्यात आली. सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते.

या मोहिमेत विशेष कामगिरी करताना पोलिसांनी न्यायालयाकडून अनेक वेळा समंस निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटकवारंट निघाले होते असे एकूण 28 अटक वॉरंट व एक पोटगी असे एकूण 29 वॉरंटची बजावणी करण्यात आली.

सदर अटकवारंट मधील इसमांना पकडून न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. या मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त 49 जामीन पात्र वॉरंटची ही बजावणी करण्यात आली.

Related posts

लंपि स्कीनला घाला आळा! पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा!!

Santosh Awchar

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

Santosh Awchar

जांभरून येथील घरफोडी प्रकरणातील आरोपी चार तासात गजाआड! 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment