Marmik
महाराष्ट्र

कावड सह 30 हजार भाविकांनी घेतले श्री सिद्धनाथ महाराजांचे दर्शन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-

नंदगाव – औंढा नागनाथ तालुक्यातील तीर्थक्षेत्र गांगलवाडी येथील श्री सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी शेवटच्या श्रावण सोमवार रोजी कावड सह 25 ते 30 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. आलेल्या सर्व भाविकांसाठी प.पू. महंत आत्मानंदगिर महाराज यांच्याकडून फराळ व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथे असलेले श्री क्षेत्र सिद्धनाथ महादेव (मठ) हे महाराष्ट्रसह इतर अनेक राज्यात प्रसिद्ध आहे. हे ठिकाण औंढा नागनाथ, अंजनवाडा महादेव, अमक सिद्धनाथ सह जागृत देवस्थान असलेल्या नागगंगा-सिद्धगंगा नदीच्या संगमावर असलेले प्राचीन मंदिर असून येथे भाविकांची दर्शनासाठी नेहमीच रेलचेल असते.

त्यातच श्रावण मासानिमित्त येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून श्री सिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेतले. येथे कुठलाही भाविक महाप्रसाद करतात व स्नान करून सुद्धा भाविक भक्तांसाठी प.पू. महंत आत्मानंदगिर महाराज चहा फराळाची सोय करतात. श्रावण मासात रक्षाबंधन गोकुळाष्टमी एकादशी असे अनेक धार्मिक सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. यानिमित्त दररोज भजन कीर्तन असे कार्यक्रम पार पडले.

श्रावण मासानिमित्त श्री क्षेत्र सिद्धनाथ येथे विविध ठिकाणावरुन दिंडी कावड हे येथे येतात. 22 ऑगस्ट रोजी श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने येथे जवळपास 25 ते 30 हजार आणि पहाटे 5 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्री सिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेतले. आलेल्या भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. श्रावण निमित्त येथे अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने फाटल्याने यात्रेचे स्वरूप दिसून आले.

प.पू. महंत आत्मानंदगिर महाराज यांच्याकडून दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना फराळ व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. सर्व भाविकांनी दर्शन झाल्यानंतर फराळ व नाश्त्याचा लाभ घेतला.

Related posts

रेल्वेप्रश्नी हिंगोली कर आक्रमक; उद्या रेल्वेरोको व जिल्हा बंद आंदोलन

Gajanan Jogdand

विना शूज, हॅन्ड ग्लोज चे कर्मचारी उपसताहेत नाल्या; हिंगोली नगर परिषदेचा भोंगळ कारभार

Gajanan Jogdand

बँकांनी शासकीय योजनेतील कर्ज वाटप संवेदशनशीलपणे करावे – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

Gajanan Jogdand

Leave a Comment