मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – तालुक्यातील आजेगाव येथील 33 के.व्ही. उपकेंद्रातील अतिरिक्त मंजूर असलेले रोहित्र तात्काळ बसविण्यात यावे या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी उपकेंद्रासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अधीक्षक अभियंता हिंगोली यांना निवेदन दिले आहे.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील 33 उपकेंद्रास 5 mva चे एक विद्युत रोहित आहे. यावर परिसरातील ताकतोडा, वाघजाळी यांच्यासाठी शेती पंपाकरिता स्वतंत्र दोन फिडर आहेत. या दोन्ही फिडरचा लोड 300 A च्या वर जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे.
त्यामुळे सदर फिदर वरील वाघजाळी, ताकतोडा, वलाना, वरखेडा, म्हाळशी, मन्नास पिंपरी, शेगाव, कहाकर बु., बटवाडी या गावांना महावितरण तर्फे केवळ चार – चार तास विद्युत पुरवठा केला जातो. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते.
सदरील 33 केवी उपकेंद्र 5 mva या अतिरिक्त विद्युत रोहित्र मंजूर असून देखील त्याचे काम अद्याप पर्यंत सुरू झालेले नाही.
त्यामुळे मंजूर असलेले सदरील अतिरिक्त विद्युत रोहित्र तात्काळ बसविण्यात यावे व शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीत होणारे नुकसान टळावे अन्यथा 25 सप्टेंबर पासून सदरील उपकेंद्रासमोर परिसरातील ग्रामस्थांसह अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांची स्वाक्षरी आहे.