Marmik
Hingoli live

41 अटक वॉरंट व चार पोरगी वॉरंटमधील इसमांना पकडून न्यायालयात केले हजर, विशेष मोहिमेत हिंगोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैधनविरोधात विशेष कार्यवाहीची नोंदणी राबविली जात आहे. त्याच सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वारणानुसार हजर व्हावेत आहे, परंतु असे न्यायालयाकडून वेळोवेळी समाज निघूनही तारखेवर हजर न राहणारे व त्यांच्या बाबत न्यायालयाकडून प्राप्त अजमीन पात्र व जामीन पात्र वॉरंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

14 डिसेंबर रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे, वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनात आज रोजी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत अजामीनपात्र जामीन पात्र वॉरंट पोटगी वॉरंट बाबत विशेष मोहीम घेण्यात आली.

सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते. या मोहिमेत विशेष कामगिरी करताना पोलिसांनी न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स देऊनही तारखेवर न्यायालयात हजर राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते असे एकूण 41 बजावणी करण्यात आली.

त्यातील इसमांना पकडून न्यायालया समक्ष हजर करण्यात आले तर चार पोटगी वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. तसेच या मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त जामीन पात्र असे 65 वाऱ्यांची संबंधितांना बजावली करण्यात आली.

Related posts

हिंगोली चा दहावीचा टक्का @94.77

Santosh Awchar

हिंगोली लोकसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी 119 अर्जांची उचल; एकही अर्ज दाखल नाही

Santosh Awchar

सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम: आसेगाव, थोरवा येथील शाळांमध्ये विविध कार्यक्रम

Santosh Awchar

Leave a Comment