मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – नात्यात दुरावा निर्माण झालेले 43 संसार पोलिसांच्या मध्यस्थीने नव्याने फुलले आहेत. हिंगोली येथील भरोसा सेलने यात उल्लेखनीय कामगिरी केली.
डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी तसेच अवैध धंदे यांच्याविरुद्ध कठोर भूमिका घेऊन धडक कार्यवाही सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय येथील विविध विभागातील प्रशासनही अधिक गतिशील व अधिक कार्यक्षम केल्या असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेलही उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
सदर भरोसा सेल मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इस्माईल, महिला पोलिस अंमलदार सुनीता शिंदे, स्वाती डोलारे, अरुणा पेदोर, अनिता जाधव, वर्षा शिंदे, समुपदेशक दिपाली लोणकर व योगेश महाजन यांची नेमणूक झालेली आहे.
नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच समुपदेशक यांनी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेल येथील कार्यालयात महिलांच्या कौटुंबिक वादाच्या तक्रारी अर्जात माहे नोव्हेंबर 2022 मधील बैठकीत ठेवण्यात आलेल्या एकूण 74 कौटुंबिक तक्रारी अर्जन पैकी 43 अर्जांमध्ये ज्यात सदर अर्जातील पती व पत्नी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले होते.
त्यांच्या संसारात वाद सुरू होते अशा जोडप्यांना योग्य व समर्पक समुपदेशन करून त्यांच्या संसारात निर्माण झालेला दुरावा मिटवून त्यांच्या संसारात गोडवा आणण्यात हिंगोली येथील भरोसा सेल यांनी केलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आहे.
5 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे भरोसा सेल यांच्याकडून समेट तडजोड घडून आणलेल्या 43 जोडप्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या पुढील संसारीक जीवन सुखमय होण्यासाठी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक गृह वैजनाथ मुंडे व भरोसा सेल मधील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच समुपदेशक हजर होते.
या कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक यांनी भरोसा सेल यांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली.