Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

सिडको एमआयडीसी पोलिसांचे नारेगाव, बलुच गल्लीत 5 तास कोंबिंग ऑपरेशन; अनेक गुन्हेगारांच्या घरांची घेतली झडती, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजी नगर – सिडको एमआयडीसी पोलिसांनी नारेगाव, बलूच गल्लीत पाच तास कोम्बिंग ऑपरेशन राबवून ३० गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी पत्रकारांना दिली.

शहरात लुटमारीसह गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने मंगळसूत्र चोरीसह मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील बहुतांश गुन्हेगार मिसारवाडी, नारेगाव, बलूच गल्लीच्या जवळील भागात स्थायिक झाले आहेत.

ही बाब निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक पातारे यांनी ३५ कर्मचारी, ६ अधिकाऱ्यांसह शुक्रवारी रात्री ८ ते मध्यरात्री १ दरम्यान हा परिसर अक्षरशः पिंजून काढला. ३० गुन्हेगारांच्या घरांची कसून झडती घेतली.

दारूचे सेवन, गांजा ओढणाऱ्यांना पकडून अद्दल घडवली. विनाकारण फिरणाऱ्यांनाही दणका दिला. गौस शार्दूल पठाण (३४) व देवेंद्र शीतलप्रसाद लोधी (२५, दोघेही रा. हुसेन कॉलनी) यांना नशा करताना रंगेहात पकडून त्यांच्याकडून ३०० पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या जप्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

अशा मोठ्या कारवाया वारंवार पोलिसांनी राबविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Related posts

जितो लेडीज विंग तर्फे उडाण प्रदर्शनाचे आयोजन

Gajanan Jogdand

महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तूंची तीन दिवसात लाखावर विक्री

Gajanan Jogdand

सुरेखा भंसाली संस्कार नारीरत्न पुरस्काराने सम्मानित

Gajanan Jogdand

Leave a Comment