मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स निघूनही तारखांवर न्यायालयात हजर न राहणाऱ्या एकूण 53 अजामीन पात् पात्र व पोटगी वॉरंटमधील इसमांना हिंगोली पोलिसांनी पकडून न्यायालयात हजर केले. सदरील कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने करण्यात आली.
जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैध धंद्यांविरोधात विशेष कार्यवाहीची मोहीम राबविली जात आहे.
त्याच सोबत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वॉरंटनुसार तारखेवर हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून प्राप्त अजामीनपात्र तसेच जामीनपात्र वारंट, पोटगी वॉरंट बजावली बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
28 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनात आज रोजी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत अजामीन पात्र, जामीनपात्र वॉरंट, पोटगी वॉरंट बाबत विशेष मोहीम घेण्यात आली. सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते.
या मोहिमेत विशेष कामगिरी करताना पोलिसांनी न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते असे एकूण 51 अटक वॉरंटची अंमलबजावणी व दोन पोटगी वॉरंटची बजावणी केली आहे. सदर अटक व पोटगी वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालया समक्ष हजर करण्यात आले.
या मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त 52 जामीन पात्र वाऱ्यांची ही बजावणी करण्यात आली.