मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील नगर परिषदेची शहर वाशियांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी असे दोन्ही मिळून आत्तापर्यंत सात कोटी 92 लाख 73 हजार रुपयांची थकबाकी झालेली आहे. सदरील थकबाकीच्या वसुलीसाठी हिंगोली नगर परिषदेचे पथक वसुली मोहीम जोरात करत आहे.
हिंगोली नगरपरिषदेकडून जानेवारी महिन्यात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली केली जात आहे. सदरील वसुली न देणाऱ्या कर धारकांवर कार्यवाही केली जात आहे कर वसुलीसाठी हिंगोली नगर परिषदे कडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
हिंगोली नगर परिषदेची शहरातील नागरिकांकडे चार कोटी तीन लाख 98 हजार एवढी मालमत्ता कर थकबाकी असून आतापर्यंत नगरपरिषदेने 2 कोटी वीस लाख 3 हजार रुपयांची वसुली केली आहे तर पाणीपट्टी 2 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांची थकबाकी असून यापैकी हिंगोली नगरपालिकेने एक कोटी 15 लाख 36 हजार रुपयांची वसुली केली आहे.
आर्थिक वर्षाअखेर कालावधी असल्याने शहरातील शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून हिंगोली नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जानेवारी रोजी विशेष वसुली पथकाने हिंगोली शहरातील एनटीसी मधील एका मालमत्ता धारकाकडे मागील दोन वर्षापासून थकीत रक्कम असल्याने वारंवार सांगून, नोटीसा देऊन सुद्धा सदरील मालमत्ता धारकाने त्यांच्याकडील थकीत रक्कम भरणा न केल्याने 23 जानेवारी रोजी सदर मालमत्ता क्रमांक 23 – 2623 ला वसुली पथकामार्फत सील ठोकण्यात आले.
अशाप्रकारे आत्तापर्यंत या विशेष पथकाने शहरातील चार बालमत्ता कर थकबाकी धारकांच्या गाळे यांना सील ठोकले आहे.
यावेळी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी उमेश हेंबाडे, बाळू बांगर, शिवाजी घुगे, राजेश पद्मने बी. के. राठोड, विजय रामेश्वर, मनोज बुरशे आदींची उपस्थिती होती.