हिंगोली : संतोष अवचार – माहेर जानेवारी फेब्रुवारी 2022 मध्ये महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या श्रेणी वर्धन अहवालातून हिंगोली जिल्ह्यात 98 बालके तीव्र कुपोषित आढळून आले होते. या बालकांना दररोज सूक्ष्म द्रव्य घटक देण्यात आल्याने सदरील बालकांच्या प्रकृतिक लक्षणीय सुधारणा झाली आहे. या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा करण्याचे काम 91 टक्के झाले असून सध्या आठ बालके तीव्र कुपोषित असल्याची माहिती हिंगोली जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश वाघ यांनी दिली आहे. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने माहे जानेवारी, फेब्रुवारी 2022 मध्ये बालकांच्या श्रेणी वर्धना बाबत ची माहिती घेण्यात आली होती. यामध्ये हिंगोली प्रकल्पातून 9, सेनगाव प्रकल्पातून 6, औंढा नागनाथ प्रकल्पातून 22, वसमत प्रकल्पातून 43, कळमनुरी येथून 3, आखाडाबाळापुर प्रकल्पातून 15, असे एकूण 98 बालके तीव्र कुपोषित आढळून आले होते. या बालकांना तातडीने संबंधित अंगणवाड्यांच्या माध्यमातून सूक्ष्म द्रव्य घटक देण्यात देऊ लागले होते. तसेच संबंधित बालकांच्या पालकांना माहिती व मार्गदर्शनही केले जाऊ लागले आहे. यातून चांगले परिणाम घडून येऊन दिनांक 11 मे अखेर झालेल्या श्रेणी वर्धन मध्ये एकूण तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येतून 72 बालके बाहेर येऊन सामान्य बालकांच्या श्रेणीत आले तर 18 बालके हे मध्यम बालकांमध्ये आले सध्या 8 बालके तीव्र कुपोषित असून त्यांना दररोज सूक्ष्म द्रव्य घटक दिले जात आहेत. त्यांच्या श्रेणी वर्धना चा अहवाल 15 जून रोजी प्राप्त होणार आहे. जिल्हा परिषदेकडून सदरील बालकां चे कुपोषण दूर करण्याचे काम 91% झाले पूर्ण झाले असून तीव्र कुपोषित असलेले आठ बालकेही पूर्ण बरे होतील असा विश्वास हिंगोली जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश वाघ यांनी मार्मिक महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला.
next post