हिंगोली : संतोष अवचार /- येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील वसई येथे पथकाने छापा मारला असता शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजा ची झाडे व सुका गांजा असे एकूण एक लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. या गांजाच्या शेतीने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून अवैध धंदा विरुद्ध कारवाईची विशेष मोहीम चालू आहेत. या अंतर्गत 7 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गोपनीय माहिती दाराकडून कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत वसई गावातील शेतकरी प्रकाश मारुती कांबळे याने शेतात अवैधरित्या व शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे लावली. तसेच सोबत गांजा ही बाळगतो, अशी माहिती मिळाल्यावरून हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बाबत दोन सरकारी पंच व वजन काटा घेऊन वसई येथील आरोपी प्रकाश कांबळे यांच्या शेतात चार वाजून दहा मिनिटाला छापा टाकला असता सदर शेतामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुंगीकारक वनस्पती गांजाची एकूण ओळणे लावणी केलेली लहान व मोठी 45 झाडे जी पंचा समक्ष उठून त्यांचे वजन केले असता अकरा किलो 500 ग्राम भरली अंदाजे (किंमत 92 हजार रुपये) व सदर शेतातील झोपडीतून दोन प्लास्टिकच्या पिशव्या मध्ये सुखा गांजा त्याचे वजन 550 ग्राम असलेला (किंमत 16500 रुपये) असा एकूण एक लाख 8 हजार 500 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे व सुका कांदा मिळून आला. सदर मुद्दे मालाची वसईचे तलाठी काकडे यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून ओळखले सदर मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळावरून शेतमालक आरोपी प्रकाश मारुती कांबळे यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार, पोलीस अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, शंकर जाधव, सुनील अंभोरे, राजूसिंग ठाकूर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, आकाश टापरे, शेख जावेद, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, लखन ठाकूर, पो. मु. पोलीस अमलदार पवन चाटसे पोलीस स्टेशन कळमनुरी यांच्या पथकाने केली.
