Marmik
Hingoli live

कागदपत्र काढण्यासाठी हिंगोली तलाठी घालताहेत आडकाठी

हिंगोली : प्रतिनिधी /-

शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस ला सुरुवात झाली असून आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसाठी लागणारी सर्व दस्तऐवज तयार करण्यात पालक गुंतलेले दिसतात. हे दस्तऐवज बनविताना हिंगोली शहर तलाठी सध्याचे तलाठी आडकाठी घालत असून आवश्यक नसलेल्या कागदपत्रांची मागणी करत आहेत. त्यामुळे पालकांची हेळसांड होत असून कागदपत्र मिळत नसल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 ला सुरुवात झाली असून 15 जून पासून वर्गही सुरू होणार आहेत. वर्ग सुरू झाल्याने आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक आवश्यक ते सर्व कागदपत्रे काढण्यास तलाठी, तहसील कार्यालय आदी ठिकाणी जात असल्याचे चित्र आहे शिष्यवृत्तीसाठी इतर आवश्यक कागदपत्रांसह पालकांच्या उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचा असतो. हा दाखला मिळविण्यासाठी हिंगोली येथील तलाठी आवश्यकतेपेक्षा जास्तीचे कागदपत्र मागत असल्याने व ही कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने पालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सदरील दस्तऐवज मिळण्यासाठी आधार कार्ड असतांना इतर कागदपत्र मागण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्न पालक उपस्थित करत असून प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन सदरील तलाठी यांच्यावर कारवाई करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्या आधार कार्ड अनिवार्य करून सर्व कागदपत्रे देण्याबाबत संबंधितांना आदेशित करावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.

Related posts

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक, कारण मात्र गुलदस्त्यात

Gajanan Jogdand

हिंद प्रेसला लागली अचानक आग; गांधी चौकात नागरिकांचा एकच गोंधळ!

Santosh Awchar

दामिनी पथकाकडून चार इसमावर कार्यवाही! इयत्ता 8 वी ते 9 वीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन

Santosh Awchar

Leave a Comment