हिंगोली : संतोष अवचार –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल 17 जून रोजी जाहीर झाला. यावेळी मुलीचा दहावीचा निकाल 94.5 77 टक्के एवढा लागला आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्मिक महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळासाठी हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 819 विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र हरले होते. त्यापैकी 15 हजार 555 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापैकी 14 हजार 743 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष प्राविण्यासह पाच हजार 346 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 5765 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 3072 तर तृतीय श्रेणीत 563 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्मिक महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत असे आवाहनही करण्यात येत आहे.