हिंगोली : संतोष अवचार –
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र हिंगोली यांच्यावतीने दिनांक 7 ते 16 जून या दरम्यान दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती या विषयावर दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रशिक्षणार्थींना मान्यवरांकडून उद्योग उभारणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिबिरास मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. काळे व सोनवणे यांनी प्रशिक्षणार्थीं ची परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे घेतली. तसेच उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालक बोईले यांनीही प्रशिक्षणार्थींना बँक विषयी माहिती दिली व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता मुळे यांनी केले तर खिल्लारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी चव्हाण, श्रीमती जयस्वाल, प्रितेश, आकाश यांनी परिश्रम घेतले.