Marmik
Hingoli live महाराष्ट्र

विद्यासागर महाराज यांच्या महाराष्ट्रातील विहारास पोलिस बंदोबस्त द्या

हिंगोली : संतोष अवचार /-
जैन धर्मातील एक साथ संत शिरोमणी राष्ट्रसंत 108 आचार्य श्री विद्यासागर महाराज हे मध्य प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात विहारासाठी येत आहेत. यादरम्यान त्यांनी पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे चे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जैन धर्मातील साधू परमपूज्य संतशिरोमणी राष्ट्रसंत १०८ आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात विहारासाठी आगमन होत आहे. या विहारा दरम्यान आचार्यश्री यांचेसोबत महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारों श्रावक दैनंदिन २५ ते ३० किलोमीटर विहार करत असतात. सदर विहार करत असताना श्रावक-श्रविका यांचे बरोबर ज्येष्ठ नागरीक व लहान मुला – मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे विहारा दरम्यान वाहतूकीस अडथळा व गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये व अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस बंदोबस्त देणे गरजेचे असल्याने सदर विहारा दरम्यान पोलिस बंदोबस्त देणेसंदर्भात संबंधितांना योग्य ते आदेश देण्याची मागणी आमदार संतोष (दादा) बांगर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.

परमपूज्य जैन साधू आचार्य विद्यासागर महाराज यांच्या विहारा दरम्यान पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केल्याने समस्त जैनधर्मीय बंधू – भगिनींनी आमदार संतोष (दादा) बांगर यांचे आभार मानले.

Related posts

आजादी का अमृत महोत्सव : जिल्हयात आज व उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

Gajanan Jogdand

मातंग समाजाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय धरणे आंदोलन

Gajanan Jogdand

आरोग्य विभागाने सतर्क रहावे; उपसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या सूचना

Gajanan Jogdand

Leave a Comment