Marmik
Hingoli live

फिरत्या एक्स-रे मोबाईल व्हॅनद्वारे होणार टीबीवर तात्काळ उपचार

हिंगोली : संतोष अवचार /-

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे एक्स-रे तपासणीसाठी मोबाइल यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर मोबाईल एक्स-रे फॅन हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय, उपकेंद्र निहाय, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा यांच्यामार्फत गाव निहाय संशयित रुग्णांच्या याद्या तयार करून घेण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ हिंगोली जिल्हा परिषद येथून हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा क्षयरोग प्रभारी अधिकारी डॉ. निरदुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश वाघ, जिल्हा पर्यवेक्षक डी. एस. चौधरी, विस्ताराधिकारी प्रशांत तुपकरी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमांतर्गत संशयित रुग्णांना दिलेल्या तारखेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एक्स-रे तपासणीसाठी देण्याबाबत सूचना द्याव्यात व तपासणी करून घ्यावी. त्यानंतर एक्स-रे तपासणीत टीबी असल्याचे आढळून आल्यास तात्काळ टीव्ही चे उपचार सुरू करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संबंधित आरोग्य कर्मचारी, आशा यांच्यामार्फत करण्यात आलेल्या एक्स-रे तपासणीचा गाव निहाय अहवाल पुढील प्रमाणे – 20 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पोत्रा, 21 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी, 22 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडाबाळापुर, 23 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा, 24 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रामेश्वर तांडा, 25 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठा, 27 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा, 28 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी, 29 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव, 30 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा, 1 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पांगरा शिंदे, 2 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा, 4 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी, 5 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळाबाजार, 6 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरड, 7 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहरा, 8 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी, 9 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र फाळेगाव, 11 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसम व 12 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नरसी नामदेव येथे ही फिरती एक्स-रे मोबाईल गाडी जाणार आहे. या कार्यक्रमात R.S. मोहिते व जिल्हा क्षयरोग केंद्र हिंगोली हे एक्स-रे टेक्निशियन आहेत.

Related posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चिखली, भिरडा, शेगाव खो., खांडेगाव येथील ग्रामस्थांशी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद 

Santosh Awchar

लसाकमचा ‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रम; हिंगोली येथे गुणवंतांचा सत्कार

Santosh Awchar

कापसाचे बियाणे न आल्याने वाघजाळीतील शेतकऱ्याची आत्महत्या, पारस कंपनी विरुद्ध गुन्हा

Gajanan Jogdand

Leave a Comment