हिंगोली : संतोष अवचार /-
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी लेखी आश्वासन दिले आहे.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला मंजूर शिक्षकांची पदे भरण्यासाठी 20 जून रोजी सकाळीच जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन तसेच ग्रामस्थांनी 14 जून रोजी व सेनगाव पंचायत समिती अधिकारी यांनी 16 जून रोजी दिलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषद प्रशाला जळगाव येथे संचमान्यता सन 2018 – 19 नुसार एक पद करा पत्रीत मुख्याध्यापकाचे मान्य आहे. तर माध्यमिक शिक्षकांचे पाच पदे मंजूर असून त्यापैकी तीन कार्यरत असल्याचे नमूद केलेले आहे. मात्र, चित्रकला शिक्षकाचे एक पद संच मान्यतेनुसार मंजूर नाही. त्यामुळे आपल्या प्रशालेत केवळ दोन पदे माध्यमिक शिक्षकांचे रिक्त आहेत. त्यामुळे आपल्या गावातील प्रशाला प्राथमिक शिक्षक प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या 14 जुलै रोजी ऑनलाइन बदल्या झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत माध्यमिक शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर या शाळेला इंग्रजी व माध्यमिक शिक्षक गणित या विषयाचे शिक्षक दिले जातील, असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी लेखी दिले आहे.