Marmik
Love हिंगोली

नगर परिषदेच्या नूतन इमारतीवर बसले आगे मोहोळ

हिंगोली : संतोष अवचार /-

येथील नगर परिषदेच्या नूतन इमारती बर दोन आगे मोहोळ बसले आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच लोकार्पण झालेल्या या इमारतीवर एवढ्या लवकर आग्यामोहोळ बसल्याने हा कौतुकाचा विषय ठरत आहे.

हिंगोली नगरपरिषदेची इमारत नांदेड रोडवर उभारण्यात आलेले आहे. प्रशस्त व अवाढव्य असलेल्या या इमारतीचे बांधकामही तेवढेच मोठे आहे हिंगोली हा इमारतीचा सिम्बॉल नगरपरिषदेचे आयकॉन ठरत असून लव्ह हिंगोली हे सिम्बॉल असलेल्या गेटमधून मध्ये येताच उजव्या बाजूला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दोन आगे मोहोळ बसल्याचे नागरिकांना दृष्टीस पडत आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच बांधकाम झालेल्या या इमारतीवर दोन आग्यामोहोळ बसल्याने हा कौतुकाचा विषय ठरत आहे. यातील एक आगे मोहोळ हे जिना कडील बाजूला असून दुसरे आगे मोहोळ हे बांधकाम विभागाच्या वरच्या मजल्यावर बाहेरच्या बाजूने आहे. एखाद्या नागरिकाने आगे मोहोळ यास छेडछाड केल्यास कर्मचाऱ्यांच्या व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या हा प्रसंग जीवावर बेतू शकतो. सेनगाव तहसील कार्यालयात दोन महिन्यापूर्वीच आगे मोहोळ उठल्याने आगे मोहोळ आणि चावा घेऊन अनेकांना जखमी केल्याची घटना घडली होती. हिंगोली नगर परिषद असा काही प्रसंग उद्भवू नये हीच अपेक्षा.

Related posts

हिंगोलीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी, प्रेक्षक गॅलरी उभारणीच्या कामाला सुरुवात

Gajanan Jogdand

मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढविल्यास डीजे वर होणार कारवाई

Santosh Awchar

लोकसभेसाठी स्थानिक उमेदवाराची चाचपणी व्हावी; विकासशील उमेदवार शोधण्याचे आव्हान!

Gajanan Jogdand

Leave a Comment