हिंगोली : संतोष अवचार /-
जिल्ह्यात घडणाऱ्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर 22 जून रोजी सकाळी 10 वाजता सडक सुरक्षा जीवन रक्षा कार्यक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले या मोटारसायकल रॅली काढून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यातून जाणारे अनेक महामार्ग हेच मृत्यूस आमंत्रण देत असून वाहनधारकांनी वाहनांचा वेग व वाहनांवर लक्ष केंद्रित करावे, याबाबत प्रशासनाकडूनही सूचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव या राष्ट्रीय महामार्गावर एकाच महिन्यात अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे हा महामार्ग चर्चेचा विषय ठरलेला होता सदरील महामार्गावर वेग दिशादर्शक व एक वेग नियंत्रक फलक बसविण्याची मागणी आहे. वाहनधारक आत रस्ता सुरक्षा भागवत जनजागृती होण्यासाठी 22 जून रोजी हे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी वाखारे, पोलीस निरीक्षक कच्छवे, पोलीस निरीक्षक सय्यद, आरटीओ जगदीश माने, नलिनी काळपांडे, हराळ, तडवी, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आढाव एन सी सी चे मेजर पंढरीनाथ घुगे, क्रीडा विभाग प्रमुख आनंद भट्ट, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्यासह पोलीस व आरटीओ कार्यालयातील व प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते की मोटर सायकल रॅली हिंगोली शहरातील विविध भागातून करण्यात आली.