सेनगाव : जगन वाढेकर /-
तालुक्यातील आडोळ येथील शेतकऱ्यांचे स्वतःची जमीन पेरणीसाठी मिळत नाहीये. जमिनीवरील इतरांचा ताबा काढून सदरील जमीन आम्हाला परत देण्याबाबत या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती. तहसीलदार यांनी आदेश काढून मंडळाधिकारी यांना आदेशित केले होते; मात्र सदरील मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील गट क्रमांक 51 मधील शेतकरी अनंता उत्तम भुक्तर, दिलीप उत्तम भूक्तर, वंदना ज्ञानदेव खिल्लारे, वंदना बीबीसार खिलारे, ज्ञानदेव गणपत खिलारे, कमलबाई राहुल खिलारे यांच्या नावे प्रत्येकी 1.60 आर इतकी जमीन आहे. तसेच महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन यांच्या नावावर 3. 42 आर इतकी जमीन आहे वनविभागाने त्यांची जमीन ताब्यात घेतली, परंतु इतर मालकांच्या जमिनीवर आडोळ येथील गट क्रमांक 50 मधील शेतकरी यांनी अतिक्रमण केलेले आहेत. पीडित शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातून गट क्रमांक 51 हद्द कायम मोजणी केली असून भूमापन अधिकारी गोरे यांच्या हस्ते नकाशा मिळवलेली आहे. वरील जमीन अर्जदारांच्या ताब्यात देऊन जमिनीवर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी 19 मे रोजी सेनगाव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत तहसीलदार यांनी 27 मे रोजी पुसेगाव विभागाचे मंडळ अधिकारी यांना आदेशित करून सदरील प्रकरणात विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यास बजावले होते; मात्र तहसीलदारांच्या या आदेशांना मंडळाधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. शेतकऱ्यांनी ंडळ अधिकार्य
सध्या पावसाने ओढ दिली असली तरी अनेक ठिकाणी पेरण्या होत आहेत. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केलेली आहे; मात्र आडोळी येथील पीडित शेतकऱ्यांना त्यांचीच स्वतःची जमीन पेरणीसाठी मिळत नसल्याने मंडळ अधिकाऱ्यांच्या कचखाऊ धोरणाने त्यांचा हंगाम वाया जातो की काय अशी भीती या शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. तहसीलदार यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी कारवाई करावी व संबंधित मंडळ अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही शेतकऱ्यांतून होत आहे.
मंडळ अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक
सेनगाव तहसीलदार सदरील प्रकरणात विनाविलंब कारवाई करण्याचा आदेश पुसेगाव विभाग मंडळ अधिकार्यास पत्राद्वारे दिला होता. यावर मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. आपली जमीन पल्याला केव्हा मिळणार याबाबत ही शेतकरी मंडळ अधिकार्यास विचारात असून मंडळ अधिकारी या शेतकऱ्यांकडून शेती संबंधातील विविध कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सेनगाव तहसीलदार यांनकडून शेतकऱ्यांची अडवणूक