हिंगोली : संतोष अवचार
लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उपक्रमांतर्गत 26 जून रविवार रोजी हिंगोली येथील शासकीय येथे इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ल. सा. क. म.चे अध्यक्ष प्रेम कुमार सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. अमोल धुमाळ हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक पुंडलिक वाघमारे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापक हरिभाऊ सोनवणे यांनी दहावी आणि बारावी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी शोभाताई धुमाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थियांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेमकुमार सोनवणे, हरिभाऊ सोनवणे, कमलाजी मानवतकर, रामानंद आठवले, आत्माराम गायकवाड, नामदेव खंदारे, भानुदास खंदारे, रवींद्र खंदारे, श्रावण मंडलिक, गंगाप्रसाद भिसे, द्वारकादास गायकवाड, नंदकिशोर आठवले, सुदाम गवळी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खंदारे यांनी केले. रविंद्र खंदारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.