Marmik
Hingoli live

पाच जुलै रोजी रोजगार मेळावा

हिंगोली : संतोष अवचार

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्यामार्फत दि. 5 जुलै, 2022 रोजी कयाधू सर्व्हिसेस ट्रेनिंग सेंटर, राघव बिल्डींग, भारत पेट्रोलियम व जुनी जिजाऊ शाळेजवळ, कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.           

या मेळाव्यात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा चाकण, पुणे, बडवे इंजिनिअरींग,औरंगाबाद, बजाज इलेक्ट्रीकल्स लि.औरंगाबाद व पुणे येथील 650 रिक्त पदे दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार  https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.           

जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास 9834104727 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

Related posts

तूर, भुईमूग सहा हजार रुपयांच्या वर; शेतकऱ्यांतून आनंद

Gajanan Jogdand

मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी लुटले वान, जिल्हाभरात संक्रात सण उत्साहात साजरा

Gajanan Jogdand

भरोसा सेलने 24 संसाराच्या गाठी केल्या घट्ट! मतभेद विसरून पती-पत्नी व सर्व परिवार आनंदाने आला पुन्हा एकत्र

Gajanan Jogdand

Leave a Comment