हिंगोली : संतोष अवचार
शहरातील खटकाळी बायपास भागात असलेल्या अनुसूया बाल विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यालयातील लहानग्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून परिसरात प्रभात फेरी काढली. या लहानग्यांना पाहून जणू त्यांची पावले पंढरीच्या दिशेने जात असल्याचा भास परिसरातील नागरिकांना आला.
हिंगोली शहरातील खटकाळी भागात असलेल्या अनुसूया बाल विद्यामंदिर या शाळेत अनेक बालके शिक्षण घेतात शाळेच्या स्तुत्य उपक्रमाने पालकांची पावले आपल्या पाल्यांचे प्रवेश घेण्यासाठी या शाळेकडे वळतात शाळेकडून आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची व वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. अनेक लहानग्यांच्या हातात भगवी पताका व विद्यार्थिनींच्या डोक्यावर वृंदावन होते. करण्यात आलेल्या आकर्षक वेशभूषाने या लहानग्यांनी सर्वांचेच लक्ष आकर्षित केले होते. शाळेची ही दिंडी शाळेपासून श्री मारुती मंदिरा पर्यंत नेण्यात आली. तेथे दर्शन व प्रसाद घेतल्यानंतर ही दिंडी शाळेत पोहोचले यावेळी दिंडी मार्गातील सर्वच नागरिकांचे लक्ष या लहानग्यांच्या दिंडीने आकर्षून घेतले होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह प्राचार्य मेघा फडणीस मोरे शिक्षिका छाया हरकळ यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी च्या विविध गीतांवर नृत्य ही केले.