Marmik
Hingoli live Love हिंगोली

न.प.संघटनेचे राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार

हिंगोली : संतोष अवचार

नगरपरिषद सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्या संदर्भात सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य करून घेतल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डीपी शिंदे यांचा हिंगोली येथील नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने 11 जुलै सोमवार रोजी सकाळी 10 वाजता अग्निशमन दल येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी मुन्ना भाऊ किर्तनकार, माहादू आठवले, संजय ननवरे, सुनिल लोखंडे, विजयसिंग पतरोड, रवि गायकवाड, महिला सफाई कर्मचारी सोमाबाई वाघमारे, सुनिता पतरोड, वर्षा घोडे, यांच्या सह मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे यांनी पुढील महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करून मागण्या मान्य करून घेण्यासाठी भेट घेणार असल्याचेही राज्य अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषद चे सफाई कर्मचारी माधव आठवले यांच्या मुलींने इयत्ता 10 वी च्या परिक्षेत 84 टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. त्याबद्दल पुजा माधव आठवले हिचा सत्कार राज्य अध्यक्ष डी.पी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्य करावे, अशी अपेक्षाही डी.पी. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

मी सदैव कर्मचार्‍यांच्या पाठीशी – राज्य अध्यक्ष शिंदे

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डी.पी. शिंदे हे मागील काही वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्याला यश मिळताना दिसून येत आहे. त्यांच्यामुळे हिंगोली येथील सफाई कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळू लागले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तुन आनंद व समाधान व्यक्त होत असून हे कर्मचारी नव्या उमेदीने आपले काम करताना दिसत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे डीपी शिंदे यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी पाचशे रुपये जमा करून ते डी.पी. शिंदे यांना देणार होते मात्र राज्य अध्यक्ष श्री शिंदे यांनी सफाई कर्मचार्‍यांचे हे पैसे घेण्यास नकार दिला व हे कर्मचाऱ्यांचे पैसे परत केले. उलट आपल्या परीने संघटनेच्या माध्यमातून जे – जे शक्य होईल ते ते कर्मचाऱ्यांना दिले जाईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी उभा राहील, असे राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे यांनी मार्मिक महाराष्ट्र कडे बोलताना सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या शिक्षणासाठी ही पुढाकार घेईल – शिंदे

हिंगोली येथील नगर परिषदेचे सफाई कर्मचारी माधव आठवले यांची मुलगी पूजा माधव आठवले हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. या मुलीचा सत्कार नगर परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डी.पी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे सफाई कर्मचाऱ्यांची मुलेही मोठ्या पदावर जावीत यासाठी या विद्यार्थ्यांना कुठे अडचण आल्यास आपल्याकडून जे शक्य होईल तितक्या प्रमाणात सोडवून सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना मदत केली जाईल, असेही राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे यांनी सांगितले.

Related posts

जागतिक महिला दिन: सेनगाव पंचायत समितीत महिला ग्रामसेवकांचा सन्मान

Gajanan Jogdand

शालेय पोषण आहाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश

Gajanan Jogdand

वाहन चोरणारी आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात! एक आयशर टेम्पो व अल्टो कार जप्त

Gajanan Jogdand

Leave a Comment