हिंगोली : संतोष अवचार
शहरालगत असलेल्या पारोळा येथील धबधबा संततधार पावसाने ओसंडून वाहू लागला आहे. हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासह दूरवरील पर्यटक पारोळा येथे दाखल होत आहेत.
हिंगोली शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारोळा येथील धबधबा पावसाच्या संतधारेने ओसंडून वाहू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठ ते नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. होत असलेल्या संततधार पावसाने शेती चे नुकसान झाले आहे. तसेच अनेक नदी-नाल्यांना पूर येऊन काही गावे पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत तर अनेक गावांचा संपर्क ही तुटलेला आहे. आज 14 जुलै रोजी दुपारी बारा वाजेपासून काही काळ पावसाने विश्रांती घेतली आहे.
दरम्यान संततधार पावसाने जिल्ह्यातील पर्यटन केंद्र असलेले पारोळा येथील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. याचा आनंद घेण्यासाठी हिंगोली शहरातील महाविद्यालयीन तरुण तरुणी पर्यटक तसेच दूरवरील पर्यटकही याठिकाणी दाखल होत आहेत.