मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – युवासेना युवती जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुका गजानन पतंगे यांच्यातर्फे 18 जुलै रोजी कुरुंदा येथील पूरग्रस्तांना कपडे व औषधांचे वाटप करण्यात आले. गरज पडल्यास पुन्हा औषधी उपलब्ध करून दिल्या जातील असे युवासेना युवती जिल्हाप्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्ष हा नेहमी शेतकरी, गोरगरीब व सर्वसामान्यांच्या मदतीस धावून जाणारा पक्षी आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सूत्र पक्षाचे असून पक्षातील सर्वच जण याप्रमाणे वागतात.
वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात दोनदा पुराच्या पाण्याने वेढा देऊन अतोनात नुकसान केलेले आहे. पुराच्या पाण्याने अनेकांचे घर संसार उध्वस्त झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा बिकट प्रश्न उपस्थित झाला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवासेना युवती जिल्हाप्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे या सरसावल्या असून 18 जुलै रोजी त्यांच्याकडून पूरग्रस्त महिलांना कपडे वाटप करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच औषधांचे ही मोफत वाटप करण्यात आले.
कुरुंदा ग्रामपंचायत येथे उपसरपंच वामनराव दळवी यांच्याकडे औषधे उपलब्ध करून सुपूर्त करण्यात आले. गरज भासल्यास आणखी औषधी उपलब्ध करून दिल्या जातील असे युवा सेना युती जिल्हा प्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे यांनी सांगितले. यावेळी युवा सेना युती जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका गजानन पतंगे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी युवासेना युवती जिल्हाप्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे डॉ. प्रीती दळवी, डॉ. बारे, उपसरपंच वामनराव दळवी, डॉ. प्रभाकर दळवी, दत्तारामजी इंगोले पाटील, दीपक इंगोले पाटील, नामदेव दळवी, अशोक दळवी, वामन दळवी, काशिनाथ दळवी, बाळू इंगोले, जय लोखंडे, डॉ. गजानन पतंगे, सय्यद आयास, सलमान पठाण यांनी घरोघरी फिरून व ग्रामस्थांच्या भेटी घेऊन मोफत रुग्ण तपासणी व औषधी वाटप केले.
आरोग्य तपासणी करून मोफत औषधी मिळाल्याने तसेच कपडेही मिळाल्याने पूरग्रस्तांतून आनंद व्यक्त होत आहे.