मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर
सेनगाव – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सेनगाव येथील v.k. देशमुख मंगल कार्यालय येथे 18 ते 28 जुलै या दरम्यान भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास प्रारंभ झाला असून सेनगाव शहरातील दीडशे ते दोनशे तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे सेनगाव तालुका अध्यक्ष दिपक देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस सेनगाव शहराध्यक्ष सत्यम देशमुख यांच्या वतीने 18 ते 28 जुलै यादरम्यान v.k. देशमुख मंगल कार्यालय येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी कुठलीही पदवी किंवा बारावी पास ही पात्रतेची अट ठेवण्यात आलेली आहे. तसेच आधी नाव नोंदणी केली जाईल, नंतर मुलाखत होईल नाव नोंदणी ही मोफत केले जाईल, मुलाखतही सेनगाव येथे होणार असून नावनोंदणीसाठी व्हाट्सअप करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सेनगाव तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वया तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यातून किमान दीडशे ते दोनशे तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा निर्धार आयोजकांनी केलेला आहे.
मेळाव्यासाठी युवकांनी त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन शहराध्यक्ष सत्यम देशमुख यांनी केले आहे.