मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – तेथील नगरपरिषदेने शहरात विविध भागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते केले; मात्र काही ठिकाणी रस्त्याच्या कडेने नाल्याचं केलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून नागरिकांच्या दुकाना समोर घरासमोर घेऊन साचत आहे. तसेच या पाण्याने अनेक रस्त्यांवर चिखलणी होत आहे. याकडे नगरपरिषदेने तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास व कंत्राटदारास नाल्या खोदण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
हिंगोली नगरपरिषदेला दोन वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. या निधीतून नगरपरिषदेने अनेक प्रभागात सिमेंट काँक्रिटचे पक्के रस्ते तयार केले असे असले तरी काही ठिकाणी हे रस्ते अरुंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात दोन्ही बाजूने वाहने आल्यास काही वेळ वाहतूक विस्कळीत होते. नगरपरिषदेने असे का केले हा भाग अलाहिदा. नगरपरिषदेने अनेक प्रभागात भत्ते रस्ते केले मात्र नाल्या तयार करण्याचा विसर नगरपालिकेला पडला की काय असे वाटू लागले आहे. शहरातील नांदेड रोड पासून कोथळज जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी नाल्याचे तयार करण्यात आलेल्या नाहीत.
नगरपालिकेचे बांधकाम अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता या रोडवरील दुकानदारांनी त्यांच्या दुकाना पुढील नाल्या बुजल्याचे सांगितले. असे असेल तर संबंधितांवर कारवाई का केली नाही, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. बांधकाम अभियंता असे सांगत असले तरी या रोडवर अनेक ठिकाणी झाल्यास तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी रोड वरून काही दुकानदारांचे दुकानासमोर तसेच या रोडवरील नगरपरिषद कॉलनीतील अनेक नागरिकांच्या घरापुढे व रोडवर साचत आहे. याचा त्रास तेथील नागरिकांना होत असून तयार झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला नाल्या तयार करून द्यावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नागरिकांनी नाल्या बुजवल्या – बांधकाम अभियंता अडसीरे
हिंगोली शहरातील नांदेड महामार्गापासून कोथळज जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कडेला नाल्या बांधून देण्यात आल्या होत्या; मात्र काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानात पुढील नाल्या बुजल्या आहेत.
-आर. एस. अडसीरे, बांधकाम अभियंता, नगर परिषद हिंगोली.
इंदिरा चौकात साचते पाण्याचे तळे
हिंगोली शहरातील अकोला जाणाऱ्या रस्त्यावर कुठे एका बाजूने तर कुठे दुसऱ्या बाजूने नाल्या तयार करण्यात आल्या असल्याचे दिसते. या महामार्गावर दोन्ही बाजूने नाल्या तयार करण्यात आलेल्या नसल्याचे दिसते. परिणामी इंदिरा चौक येथे गांधी चौकाकडे जाताना मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते गेल्या अनेक वर्षांपासून येथे पाणी साचते. या पाण्यातून नागरिकांना आपले वाहने व पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत आहे. याकडेही नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.