Marmik
Hingoli live News

बेचिराख गावांचा प्रश्न लागला मार्गी, आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील वस पांगरा, गनगाव, खारवी, जवळा आदि बेचिराख गावांच्या ऑनलाईन पीक विमा संदर्भात कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी लक्ष घालून सदरील प्रश्न मार्गी लावण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्या कानावर टाकला असता सदरील प्रश्नाची तातडीने दखल घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लागला आहे. त्यामुळे आमदार संतोष दादा बांगर यांचे या गावातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील वसपांगरा,गणगाव,खारवी,रहिमापूर,कृष्णा तर्फे जवळा,देवदरी,धुमका,गारोळ्याची वाडी,चिंचोर्डी या बेचिराख म्हणून सातबारा वर नोंद असलेल्या गावांचा ऑनलाईन पीक विमा भरण्याचा अनेक दिवसांपासूनचा गंभीर प्रश्न हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्याकडे या गावातील शेतकऱ्यांनी मांडला असता आमदार संतोष (दादा) बांगर यांनी लागलीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून शेतकऱ्यांची व्यथा सांगितली.

मुख्यमंत्र्यांनी लागलीच आयुक्त यांना फोन करून शेतकऱ्यांची अडचण लगेच दूर करण्यास सांगितले आणि अनेक दिवसांपासूनचा रेंगाळत पडलेला शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. आमदार संतोष (दादा) बांगर यांनी बेचिराख गावाचा पीक विम्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावल्याबद्दल राजू पटणे, सुरज साखरे, सतीश स्वामी, प्रवीण मुंढे, प्रताप मुंढे, एकनाथ मुंढे, रामेश्र्वर मुंढे, शेषराव नागरे, पंढरीनाथ नागरे, विलास मुंढे, गजानन नागरे व 9 बेचिराख गावातील शेतकऱ्यांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांचे शतशः आभार मानले आहेत.

Related posts

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 8 मार्च रोजीजागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन  

Santosh Awchar

हिंगोली लोकसभा निवडणूक : मतदान केंद्राची मराठी व इंग्रजी भाषेतील यादी प्रसिद्ध  

Santosh Awchar

पावसाने सरासरी ओलांडली! 24 तासात 21 मिलिमीटर पाऊस, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत

Santosh Awchar

Leave a Comment