Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

Hingoli अर्भकाच्या मृत्यू प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली- अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक काम करून चौकशी समिती नेमून चौकशी अहवालानुसार दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आदेश काढण्यात आले आहेत.

हिंगोली येथील पीडित महिला ही चार दिवसांपासून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेने सुलभ प्रसूतीसाठी डॉक्टरांकडे वारंवार विनंती ही केली, मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

सदरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन याप्रकरणी चौकशी समिती नेमून चौकशी अहवालानुसार दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सकाकडून कळविण्यात आले आहे.

रुग्णालयात

Related posts

विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचा दहावीचा शंभर टक्के निकाल

Gajanan Jogdand

विशेष मोहिमेत हिंगोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; फरार एकूण 50 इसमांना पकडून न्यायालयात केले हजर!

Santosh Awchar

पालकमंत्र्यांशिवाय होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ध्वजारोहन

Gajanan Jogdand

Leave a Comment