Marmik
Hingoli live Love हिंगोली News

Hingoli जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी पापळकर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली –  वैद्यकीय आस्थापनांमध्ये निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट “जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016” प्रमाणे लावण्यात येईल, याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी,  असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.           

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उपप्रादेशिक अधिकारी- म. प्र. नि.मंडळ परभणी, पोलीस उपअधीक्षक हिंगोली इत्यादी उपस्थित होते.

या  बैठकीमध्ये  जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक, डिस्पेंसरी, पॅथॉलॉजी लॅब, पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र व प्राधिकारपत्र घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले. 

सर्व वैद्यकीय आस्थापना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीपत्र व प्राधिकारपत्राशिवाय चालू राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

Related posts

Hingoli अतिवृष्टी ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Santosh Awchar

हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध! एमपीडीए कायद्या अंतर्ग अंतर्गत 12 वी कार्यवाही

Santosh Awchar

कमी पीक कर्ज वितरण करणाऱ्या बँकाची माहिती द्या- पालक सचिव नितीन गद्रे 

Santosh Awchar

Leave a Comment