Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

Hingoli शेतकऱ्यांचे चुकारे बुडविणाऱ्या नाफेड विरुद्ध शेतकऱ्यांचा सत्याग्रह

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शेतकऱ्यांचे चुकारे घडविणाऱ्या नाफेड महा फार्म कंपनी विरुद्ध किसान सभेच्या वतीने 25 जुलै रोजी दुपारी बारा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व सत्याग्रह करण्यात आला.

नाफेड फार्मर कंपनीने शेतकऱ्यांकडून सुमारे सहा हजार क्विंटल हरभरा खरेदी केला. मात्र या हरभऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना न देता कंपनीने ते बुडविले. त्यामुळे नाफेड महा फार्मर कंपनी विरुद्ध कारवाई करा, शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तात्काळ अदा करा, सुमारे सहा हजार क्विंटल खरेदी केलेल्या हरभरा या शेतमालाची कोणतीही किंमत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली नाही, सदर शेतकऱ्यांचा हरभरा नाफेड व महाएफपीसी प्रशासनाच्या कब्जात आहे.

सर्व हरभरा खरेदी केलेल्या मालाची संगणकात त्याच दिवशी नोंद न करता अनेक दिवस विलंब करण्यात आला परिणामी शेकडो शेतकऱ्यांच्या विक्रीची नोंद घेण्यात आलेली नाही, त्याच बरोबर काही व्यक्तींच्या नावाने कोणताही शेतमाल घेतलेला नसताना बोगस नावाने नोंदी करून शेतकऱ्यांची फसवणूक देखील केलेले आहे.

हा प्रकार जाणीवपूर्वक व हेतुतः करण्यात आलेला आहे, हरभरा खरेदी करताना प्रती कट्टा 50 किलो व 600 ग्रॅम बारदाना याची तरतूद असताना प्रत्येक शेतकऱ्याकडून 51 किलो हरभरा 20 ग्राम बारदाना गृहीत धरून खरेदी करण्यात आली. यामध्ये शेती मालाची लूट करण्यात आली अनेक शेतकऱ्यांची खरेदी घेत असताना दिलेल्या संपूर्ण मालाचे वजन बिलासाठी ग्राह्य धरण्यात आले नाही.

हमाली व बारदाण्यापोटी वसूल केलेली नियमबाह्य रक्कम साधा करा दोषी अधिकारी व संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा, तसेच केंद्र सरकारने नाफेडचे खाजगीकरण करू नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या किसान महासभेच्या वतीने यावेळी प्रशासनाला निवेदन दिले.

या निवेदनावर बाबाराव कुटे, दीपक सानप, रमेश सानप, भगवान सांगळे, विष्णू सांगळे, बबनराव सानप, रघुनाथ सानप, अभिषेक सानप, लक्ष्मण सांगळे, प्रभाकर राऊत, ज्ञानेश्वर राऊत, विठ्ठल पारवे, प्रसाद पारवे, रामू राऊत, ज्ञानदेव गारकर, अरुण गारकर, सुनील घुगे, शांताबाई घुगे, माणिकराव घुगे, केशव घुगे, गणेश घुगे, विनोद घुगे, विजय घुगे शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related posts

ताकतोडा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

Gajanan Jogdand

लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून स्पेशल कोर्टाची स्थापना करा, सेनगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाची राष्ट्रपतींकडे मागणी

Gajanan Jogdand

डोंबिवलीत पुन्हा आग; एमआयडीसीतील कंपन्यांची सुरक्षा वाऱ्यावर!

Gajanan Jogdand

Leave a Comment