Marmik
Hingoli live News

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; लाभार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत बँक खाते आधार संलग्न करावेत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली –  प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 7 जुलै, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 60.35 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 46.44 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. याबाबत केंद्र शासनाने दूरचित्रवाणी परिषदेमार्फत राज्यातील प्रलंबित ई-केवायसी दि. 31 जुलै, 2022 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

Related posts

जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Santosh Awchar

टिटवाळा येथे शिक्षण युवा जनाधिकार संघटनेचे शिबिर

Gajanan Jogdand

पूरस्थिती : कुरुंदा व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू

Santosh Awchar

Leave a Comment