मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :-
हिंगोली – सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाने मुलींच्या वसतिगृहाच्या नावाखाली विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या निधीचा अपव्यय केला असून सदरील वसतिगृहात इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली आहे. या शाळेच्या माध्यमातून महाविद्यालयाने सीबीएससी सेंटरच्या नावाखाली पालकांची लयलूट सुरू केली आहे. सदरील प्रकाराची विद्यापीठ अनुदान आयोग आणि समाज कल्याण अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन या महाविद्यालयाची कसून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केले जात आहे.
जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला मोठ्या प्रमाणात स्वयंघोषित शिक्षण सम्राटांनी काळीमा फासला सुरुवात केलेली आहे. हे शिक्षण सम्राट शिक्षण क्षेत्राकडे निव्वळ फायद्याचा व्यवसाय म्हणून पहात असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडो अथवा न घडो त्याच्याशी यांचा काहीही संबंध नसतो. केवळ आपला व्यवसाय एवढा तेजीत चालावा यासाठी नवनवीन कल्पना राबवत असतात. याचा प्रत्यय सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयातून आला आहे.
या महाविद्यालयाने काही वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुलींच्या वसतिगृहासाठी मान्यता घेऊन व मिळालेल्या निधीतून प्रशस्त इमारत बांधली; मात्र येथे मुलींना प्रवेश दिला गेला नाही. तालुक्यातील खेड्यापाड्यातील तसेच हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातून काही विद्यार्थी व मुली या या महाविद्यालयात शिक्षणासाठी खाजगी वाहनातून अथवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीने प्रवास करून शिक्षणासाठी येतात महाविद्यालयाने मुलींच्या नावाखाली विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वस्तीगृह बांधून घेतले, परंतु या वसतिगृहातून मुलींनाच हद्दपार केले.
मागील तीन वर्षांपासून या वस्तीगृहाच्या इमारतीत आर टी एम इंग्लिश स्कूल या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. यातही सीबीएससी पॅटर्न असल्याचे सांगून पालकांकडून पैशांची लयलूट केली जात आहे. ज्या पालकांना शुल्क भरणे परवडत नाही अशा पाल्यांचे येथे प्रवेश नाकारले जातात. सध्या या इंग्लिश स्कूल मध्ये विविध वर्गाचे 300 विद्यार्थी असल्याचे समजते.
शिक्षण विभाग कुंभकर्णाच्या झोपेत
हिंगोली सहा सेनगाव तालुक्यात अनेक स्वयंघोषित शिक्षण सम्राटांनी सीबीएससी सेंटरच्या नावाखाली इंग्लिश शिकवण्या घेण्याचे वर्ग सुरू केला आहे. यातून हे शिक्षण सम्राट गडगंज संपत्ती कमावत असून सीबीएससी सेंटरच्या नावाखाली पालकांची लूट केले जात आहे. सेनगाव शहरापासून तोषनीवाल महाविद्यालय अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आहे, मात्र शिक्षण विभागाला महाविद्यालयाच्या या नवीन व्यवसायाची कल्पना नसल्याचे दिसते सर्वसामान्य पालकांना सदरील शाळा आहे. सीबीएससी पॅटर्न मान्यता आहेत की नाही याबाबत माहिती नसते. याची पडताळणी करणे शिक्षण विभागाचे काम आहे; मात्र शिक्षण विभाग तालुक्यात असा कोणत्याही ठिकाणी जाऊन तपासणी करत नसल्याचे दिसते परिणामी तोषणीवल महाविद्यालया सारख्या अनेक संस्थांचे यामध्ये फावते. या प्रकाराकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन पालकांची लयलूट थांबवावी अशी मागणी केले जात आहे.
बोर्डावर सी बी एस सी मान्यता क्रमांक नाही
श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाच्या ये आर टी एम इंग्लिश स्कूल ला सीबीएससी मान्यता असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले, परंतु बोर्डावर सीबीएससी मान्यता क्रमांक टाकण्यात आलेला नाही. बीएससी मान्यता क्रमांक हा प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेला बोर्डावर टाकने गरजेचे असताना ये आर टी एम इंग्लिश स्कूल मे तो टाकलेला नाही. यावरून सदरील शाळेला केंद्राकडून असा क्रमांक मिळाल्याचे दिसत नाही.