मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व रुग्णांना हिपॅटायटिस – बी बाबत मार्गदर्शन करून हिपॅटायटिस – बी चे लसीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ञ डॉ. दीपक मोरे, भूलतज्ञ डॉ. पवार, अस्थिरोग तज्ञ डॉ. पुंडगे, गणेश साळुंके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उद्धव कदम, जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चौधरी, श्रीमती राठोड, अधिपरीचारिका दिंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ v.एस. आंबटवार, प्राचार्य खंदारे आशिष पाटील, संजय पवार, महानंदा साबळे यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.